अर्जुनी-मोर— गट ग्रामपंचायत महालगाव येथे आज दिनांक २६ जानेवारी रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुला-मुलींनी विविध वेशभूषा परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले.
ग्रामपंचायत कार्यालयात सर्वप्रथम थोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर सरपंच मिनाताई शहारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी तिरंग्यास मानवंदना देत राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतांच्या गजरात वातावरण देशभक्तीमय केले.
यावेळी बोलताना सरपंच मिनाताई शहारे यांनी आपल्या भाषणात प्रजासत्ताक दिनाचे महत्व विशद केले. त्यांनी सांगितले की, “आपण मिळवलेले संविधान ही आपल्या देशाची खरी ताकद आहे. संविधानाने दिलेले हक्क आणि कर्तव्ये यांची योग्य अंमलबजावणी प्रत्येक नागरिकाने केली पाहिजे. समाजात एकता, समता व बंधुता जपून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.”
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच शिस्त, संस्कार आणि देशभक्ती आत्मसात करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत उपसरपंच नंदकिशोर गहाने, ग्रामपंचायत अधिकारी अरुण हातझाडे, रसिकाताई मारगाये सदस्य , ओमप्रकाश नाईक, निदेश ऊके, विशाखा शहारे, उज्ज्वला परसमोडे तसेच भाऊराव खोब्रागडे, ईश्वर खोब्रागडे, गजानन रामटेके (मुख्याध्यापक), हुकरे सर (सहाय्यक शिक्षक), साहील लाडे, काजल रामटेके (अंगणवाडी सेविका), प्रिया गेंडाम (मदतनीस), नुतन गेंडाम (पोलीस पाटील), पंकज कापगते, रंजीत नागोसे, रमेश रामटेके, कार्तिक राणे यांच्यासह गावातील बचतगटातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.





