सडक अर्जुनी–कोहळी समाज महिला मंडळ सडक अर्जुनी च्या सौजन्याने महिलांच्या सन्मानाची व सामाजिक एकोप्याची परंपरा जोपासली जावी यासाठी नगरातील कोहळी समाज महिलांनी एकत्र येवून हळद कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले.
सदर सोहळा सौ. चंद्रकला डोंगरवार जिल्हा परिषद सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली सौ . वंदना किशोर डोंगरवार उपनगराध्यक्ष तथा माजी सभापती पंचायत समिती , लता गहाणे, लीला आरसोडे ,वंदना बनसोड, मीरा कापगते, पौर्णिमा डोंगरवार, उषा डोंगरवार ,भाग्यश्री पर्वते, निशा पुसतोडे , सुषमा खुणे ,शारदा बोरकर, मीनाक्षी बोरकर , मालती परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला .
या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध खेळ, स्पर्धा, महिला सक्षमीकरण सबंधित उपक्रम राबविण्यात येवून सर्व महिलांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मधून वंदना किशोर डोंगरवार यांनी हळद कुंकू ही केवळ पूजासामग्री नसून ती भारतीय नारीशक्ति चे प्रतीक आहे व हळद आरोग्य शुद्धता व समृद्धीचे तर कुंकू सौभाग्य श्रध्दा व आत्मसन्मान चे प्रतीक आहे यामुळे महिला मधील आपुलकी आदरभाव वाढेल असे मत व्यक्त केले,
या प्रसंगी या सणाचे निमित्ताने पोर्णिमा डोंगरवार, लता गहाणे यांनी सुद्धा महिला सबलीकरण बाबतीत मार्गदर्शन केले,
कार्यक्रमाचे अध्यक्षा चंद्रकला डोंगरवार यांनी समाजातील महिलांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात घर संसार, नोकरी, शेती व्यवसाय अशा अनेक जबाबदार्या पार पाडून आरोग्य, स्वावलंबन बचत गट यांच्या माध्यमातून पुढे जाण्याच्या सल्ला दिला.
कार्यक्रमचे संचालन मीनाक्षी गहाणे यानी तर आभार प्रदर्शन भारती मस्के यांनी मानले या कार्यक्रमा साठी निशा पुसतोडे , नीलिमा हातझाडे , प्रिती कापगते, दुर्गा परशुरामकर, वैशाली डोंगरवार, ममता आरसोडे , रेखा कापगते , सरिता गोबाडे , इंदू कापगते, लता पर्वते , रुपाली डोंगरवार, शिल्पा रुखमोडे , अर्चना डोंगरवार, अलका गहाणे, भाग्यश्री कापगते, पुष्पा लांजे , शशिकला कापगते, देवागण परशुरामकर, वंदना नंदु डोंगरवार , नेहा परशुरामकर, गायत्री कापगते , रेशमा लांजे , वैशाली कापगते , स्नेहा कापगते, भावना लांजे, अर्चना डोंगरवार, लता कापगते, रेखा झोडे , शालू कापगते, लीना डोंगरवार, वर्षा मुंगूलमारे , शशिकला कापगते, अर्चना काशीवार , प्रतिभा कापगते, मीनाक्षी डोंगरवार ,रेखा कापगते, शालू कापगते यांनी कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.या कार्यक्रमात समाजातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.





