23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ सिंदीबिरी येथील जिप शाळेत स्नेह संमेलन उत्साहात साजरा

सिंदीबिरी येथील जिप शाळेत स्नेह संमेलन उत्साहात साजरा

0
58

देवरी,दि.०१- तालुक्यातील फुटाणा केंद्रांतर्गत येणाऱ्या सिंदीबिरी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत दोन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलनाचे मोठ्या उत्साहात नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

जिप शाळेच्या आवारात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिप सदस्य संदिप भाटिया हे होते. उद्घाटन म्हणून देवरी पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन तर दीपप्रज्वलक म्हणून पंस सदस्य अंबिका बंजार हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषि उत्पन्न बाजार समितीचे सदस्य यादोराव पंचमवार,चिचगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेगडकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी सतिष लिल्हारे, गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, ओमप्रकाश ढवळे, डी एन पेंदाम, जी एम बैस, विजय पुराम, कैलास साखरे, डॉ जितेंद्र रहांगडाले, चंदन किरसान, सुमित वैद्य, वसंत वट्टी, राधिका मिरी, गीता कुमेटी, अर्चना फटिंग, ममिता धानगुन,वसंता धुर्वे, दिनेश गोटे, यादोराव कुंजाम, मदिना बुढाझालिया, धनिराम पुराम, कृष्णा हारामी, मुकेश दुधनांग,लता किरसान रोशनी साखरे,सुरेंद्र डोंगरे,गोपाल भंडारी आदी मान्यवर उफस्थित होते.

दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांचे विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी जेठभावडाचे सरपंच कैलास साखरे हे उपस्थित होते. यावेळी किशोर डोंगरवार, यादोराव कुंजाम,नाथूराम डोंगरे, रामेश्वर वाघाडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धक विद्यार्थ्याना पारितोषिक देऊन गौरवान्वित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदन किरसान हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मदिना बुढाझालिया, सरपंच कैलाश साखरे, दासानुदास पंचमवार,जोहन आचले, हंसराज साखरे, उमेश किरसान,रोशनी साखरे, हितेंद्र किरसान,रवींद्र कोराम,संताराम कचलाम, आदी मान्यवर उपस्थित होते

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक गजानन पाटणकर, शिक्षक जी.एस बोबडे,पी.व्ही. मेश्राम, टी पी बोपचे आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

blank