तिरोडा : जनसेवेचे व्रत घेवून क्षेत्राच्या विकास हेच आपले ध्येय आहे. नागरिकांना होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी आपल्या मार्फत सतत पाठपुराव करणार, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अॅड. माधुरी रहांगडाले यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील लाखेगाव ते मेंढा मार्गाच्या बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. मागील अनेक दिवसांपासून लाखेगाव-मेंढा मार्गाची मोठी दुरावस्था झाली होती. मार्गावर जागो-जागी मोठ-मोठे खड्डे पडले असून खड्ड्यातील गिट्टी रस्त्यावर पसरल्याने वाहन धारकांना प्रवासा दरम्यान मोठा त्रास सहन करावा लागत असे. तसेच शेतकरी विद्यार्थ्यांना या मार्गावरून प्रवास करतांना तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागतो. या बाबीची दखल
घेत सौ. माधुरी रहांगडाले यांनी प्रशासनाची पाठपुरावा करून मार्गाच्या नव्याने बांधकामासाठी पाठपुरावा करून बांधकामासाठी निधी मंजुर करण्यात आला. दरम्यान १३ मार्च रोजी सौ. रहांगडाले यांहस्ते रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच अनिरुद्ध जुन्नेवार, पं. स सदस्य जयप्रकाश पटले, आशु पटले, भेदराम बिंझाडे, राखडू बिनजाडे, अंकित गोखले, टोपेंद्र चौधरी, आनंद बिंझाडे, कुमोद भगत, येवलेजी व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.





