24.8 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ जनआरोग्य समिती गोठणगावने केली ‘एचपीव्ही’ लसीकरण जनजागृती

जनआरोग्य समिती गोठणगावने केली ‘एचपीव्ही’ लसीकरण जनजागृती

0
48

गोंदिया,दि.१५ः-जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव आरोग्य केंद्रात वर्ष 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण मिळण्यासाठी मोहिमेचा शुभारंभ माजी आरोग्य सभापती इंजि.यशवंत गणवीर यांच्या हस्ते करण्यात आला.त्यापुर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे जनआरोग्य समितीची सभा संपन्न झाली.सभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी एचपीव्ही‘ लसीकरणाची जनजागृती करुन कार्यक्षेत्रातील  100 टक्के मुलींना एचपीव्ही लसीकरण मिळण्याच्या दृष्टीकोनातुन जनआरोग्य समितीच्या पदाधिकारींनी जनजागृती करण्याचा ठाम निर्धार केला.

यावेळी  जिल्हा परिषद सदस्य तथा माजी उपाध्यक्ष यशवंत गणवीर,जिल्हा परिषद सदस्य कविताताई कापगते,सभापती पंचायत समीती अर्जुनी मोरगाव आम्रपाली डोंगरवार,सरपंच गोठणगाव संजय ईश्वार,उपसरपंच गोठणगाव कांतीलाल डोंगरवार,उपसरपंच रामनगर संतोष मिर्धा,माजी जिल्हा परिषद सदस्य रतिराम राणे,सामाजिक कार्यकर्ता प्रतापगड सौरभजी पशिने,समिती सदस्य अशोक कापगते,कृष्णा मांडवे,डॉ.कमल सरकार,वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेंद्र घरतकर प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कविश्वर किरसान उपस्थित होते.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला दूर करण्यासाठी ज्या मुलींचे 14 वर्ष पुर्ण झाले आहे परंतु 15 वर्ष पुर्ण होण्यास आहे म्हणजेच 14 ते 15 वर्ष वयोगटातील असे मुलींचे एचपीव्ही लसीकरण होणार आहे.लसीकरण केल्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचा धोका टाळता येणार असल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेंद्र घरतकर यांनी यावेळी दिली.सभेदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यात वैद्यकीय अधिकारी डॉ.खोब्रागडे व स्नेहा कापगते,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रशांत खरात,फार्मासिस्ट मुकुल बडवाईक,समुदाय आरोग्य अधिकारी गौरव टेंभेकर व तृप्ती गहाणे,आरोग्य सहाय्यक संतोष पारधी व किशोर कुर्वे,आरोग्य सहायिका लक्ष्मी मुनेश्वर, आरोग्य सेवक अमोल मालेकर व समीर सैय्यद,आरोग्य सेविका शामकला नहामुर्ते, अर्चना शेंडे,निराशा शहारे, प्रमिला रॉय,कोमल पडोळे, यमुना मानापुरे व शशिकला कोडाप, स्टाफ ब्रदर चिरायु वावरे,आशा गट प्रवर्तक दिक्षा रंगारी व रिना टेंभुर्णे,परिचर प्रभु उईके, बंडु उके, सफाईगार कुमुद शहारे व डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रजय कर्हाडे उपस्थित होते.

एचपीव्ही‘ लसीकरण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंधासाठी अत्यंत प्रभावी व सुरक्षित आहे.14 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलींनी लसीकरण केल्यास भविष्यात संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.लसीकरणाबाबत भीती न बाळगता पालकांनी पुढाकार घ्यावा. यामुळे मुलींचे आरोग्यविषयक भविष्य सुरक्षित होवु शकते.   – यशवंतजी गणवीर, जिल्हा परिषद सदस्य तथा माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया

blank