24.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ नागरिकांसाठी सिटीझन फिडबॅक प्रणाली कार्यान्वित;जिल्हा पोलीस दलाचा उपक्रम

नागरिकांसाठी सिटीझन फिडबॅक प्रणाली कार्यान्वित;जिल्हा पोलीस दलाचा उपक्रम

0
54

गोंदिया : जिल्हयातील नागरिकांना पोलीस विभागाशी संबंधित विविध कामांकरिता जिल्हयातील पोलीस स्टेशन, जिल्हा वाहतुक शाखा, भरोसा सेल, सायबर सेल व ईतर शाखांमध्ये जावे लागते. पोलीस स्टेशन किंवा ईतर शाखांमध्ये तक्रार करण्याकरिता किंवा ईतर पोलीस विभागाशी संबंधित कामा निमित्त गेल्यानंतर त्यांची तक्रार नोंदविली गेली किंवा नाही, तसेच संबंधित पोलीस स्टेशन किंवा शााखा येथे त्यांना आलेल्या फिडबॅक अनुभवासंबंधी नागरिकांना याप्रणाली मार्फत देता येणार आहे व त्यांनी दिलेल्या फिडबॅकचे मुल्यांकन उपविभागीय पोलीस अधिकारी, अपर पोलीस अधिक्षक व स्वतः पोलीस अधिक्षक करणार आहेत. या द्वारे नागरिकांना जलद व चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळतील हे निश्चित केले जाणार आहे.
सदर प्रणाली करिता प्रत्येक पोलीस स्टेशन व शाखांमध्ये क्यु.आर. कोड असलेले बॅनर दर्शनी भागात लावण्यात आलेले आहेत. यावरील क्यु. आर. कोड नागरिक आपले मोबाईलद्वारे स्कॅन करून आपला फिडबॅक व पोलीस विभागातील कामासंबंधी आपला अभिप्राय नोंदवू शकतात. सदर फिडबॅक प्रणाली मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत उपलब्ध असुन सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा सोप्या पदधतीने तयार करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सदर फिडबॅक सिस्टमचा जास्तीत जास्त उपयोग करुन पोलीस विभागातील त्यांचे कामासंबंधी आपला अनुभव तसेच अभिप्राय देवुन सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात येत आहे.