23.9 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहात विविध उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहात विविध उपक्रम

0
83

गोंदिया, दि.3 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 14 एप्रिल रोजी विविध कार्यक्रम साजरे केले जातात. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने यंदाही दि.8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्याचा निर्णय घेतला असून गोंदिया जिल्ह्यातही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा प्रसार करत समाजात एकात्मता निर्माण करण्याचे कार्य केले. राज्यघटनेतील कलम 46 मध्ये समाजातील दुर्बल घटक, विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी राज्याने विशेष प्रयत्न करावेत, तसेच त्यांना सामाजिक अन्याय व शोषणापासून संरक्षण द्यावे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

या तत्वांच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असून त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात व जनजागृती व्हावी, या उद्देशाने ‘सामाजिक समता सप्ताह’ आयोजित केला जातो.यावर्षीच्या सप्ताहात पत्रकार परिषद, व्याख्याने, लघुनाट्य स्पर्धा, जनजागृती मोहिमा, रक्तदान शिबिरे, वक्तृत्व व निबंध स्पर्धा, योजनांवरील कार्यशाळा, संविधान जागर तसेच इतर सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.ल्ह्यातील नागरिकांनी या सामाजिक समता सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण किशोर भोयर यांनी केले आहे.