24.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त कमरगाव येथे सेवाकार्याचा जागर

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त कमरगाव येथे सेवाकार्याचा जागर

0
112

बस स्थानक परिसरात भाविकांसाठी थंडगार मठ्ठा आणि टरबूज वाटप….

गोरेगाव:परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक, महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथे सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता, स्थानिक सेवकांच्या वतीने बस स्थानक परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आणि नागरिकांना थंडगार मठ्ठा व रसाळ टरबूज वाटप करण्यात आले. भक्ती आणि सेवेचा संगम
दरवर्षीप्रमाणे यंदाही बाबा जुमदेवजी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. केवळ जयंती साजरी न करता, ‘मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा’ हा बाबांचा संदेश कृतीत उतरवण्यासाठी कमरगाव येथील सर्व सेवकांनी एकत्र येऊन हा उपक्रम हाती घेतला.

सध्या एप्रिल महिन्यातील कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत कमरगाव बस स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांना, शालेय विद्यार्थ्यांना आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना या उपक्रमाने मोठा थंडावा दिला.
यावेळी बाबांचे सेवक रावजी येल्ले, मधुकर येल्ले, सोहन येल्ले, इंद्रराज हरीणखेडे, सेवक कावळे, उईके, रोशन नागपुरे, अनिल कावळे, मस्करे, चेतलाल बेलूरकर आदी उपस्थित होते.तर या कार्यक्रमाला गावातील सामाजिक कार्यकर्ते मदनलाल अटरे, मुकेश नागपुरे, नरेश बिरणवार, जितेंद्र जैतवार, राजकुमार पटले आदी उपस्थित होते.

“बाबा जुमदेवजी यांनी नेहमीच दुःखी आणि गरजूंना मदत करण्याची शिकवण दिली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, उन्हाळ्यात तहानलेल्यांना थंडावा देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आम्ही सेवक बांधवांनी केला आहे.”— इंद्रराज हरीणखेडे स्थानिक सेवक, कमरगाव