25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ तीर्थक्षेत्र सुकाळी/डाकराम येथे ६ एप्रिलला यात्रा महोत्सवाचे आयोजन

तीर्थक्षेत्र सुकाळी/डाकराम येथे ६ एप्रिलला यात्रा महोत्सवाचे आयोजन

0
141

तिरोडा,दि.०३-: श्री तीर्थक्षेत्र सुकाळी(डाकराम) येथे सोमवार, दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी भव्य यात्रा महोत्सव, धर्मसभा आणि भजनसंध्येचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाचे उद्घाटन देशाचे दिग्गज नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महानुभाव पंथाचे विकास पुरुष प.पु.प.म. कारंजेकर बाबा (अमरावती) भूषवणार आहेत.या सोहळ्याचे दीप प्रज्वलक म्हणून माजी आमदार तथा गोंदिया जि.डि.सी.सी. बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन आणि आमदार परिणय फुके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय रहांगडाले, आमदार राजकुमार बडोले, आमदार विनोद अग्रवाल, जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जि.प. उपाध्यक्ष सुरेश हर्षे, सभापती सौ. रजनीताई कुंभरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवाची सुरुवात सकाळी ८:०० वाजता देवास मंगलस्नान, उटी व विडा अवसर कार्यक्रमाने होईल. त्यानंतर सकाळी १०:०० वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण आणि दीप प्रज्वलन करण्यात येईल. सकाळी ११:०० वाजता भव्य धर्मसभेचे आयोजन करण्यात आले असून दुपारी २:०० वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाईल. कार्यक्रमाची सांगता सायंकाळी ७:०० वाजता महाआरती आणि भजनसंध्येने होणार आहे.या धार्मिक उत्सवासाठी परिसरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, गणमान्य नागरिक व भाविक भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन या क्षेत्राचे कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य जगदीश(बालू) बावनथडे यांनी केले आहे.