30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ मधमाशांचा हल्ल्यात २५ जण जखमी

मधमाशांचा हल्ल्यात २५ जण जखमी

0
442

गोंदिया ता. ३ ः कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या २५ जणांवर मधमाशांनी हल्ला करून जखमी केले. ही घटना शुक्रवारी (ता. ३) दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडली.
येरंडी देवलगाव येथे दिनेश लक्ष्मण बागडे यांच्याकडे जेवनाचा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ३) आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने नातेवाइक आले होते. येथून नजीक असलेल्या कवठा येथील कोकणाई मंदिरात देवदर्शनासाठी कुटुंबीय व नातेवाईक गेले होते. दरम्यान, दुपारी एक एक ते दीडच्या सुमारास मंदिरात नैवेद्य व देवदर्शनासाठी जात असतानाच मधमाशांनी हल्ला केला.अचानक झालेल्या हल्ल्याने गोंधळ उडाला. मधमाशांनी तेथे उपस्थित असलेल्या लहान मुले, महिला यांना चावा घेतला.
दिनेश बागडे यांनी मधुमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेला लहान मुलांना, महिलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे दाखल केले.
फॅमिला विकास तरोणे (वय ३२), कुणाल विकास तरोणे(वय १२), माही विकास तरोणे (वय १०), सुनीता नामदेव तरोणे (वय ४२, सर्व रा. सावरटोला), काजल दिनेश बागडे (वय २७), तेजस दिनेश बागडे (वय दीड वर्षे), सुषमा कृष्णा बागडे (वय २५), प्रिन्स कृष्णा बागडे (वय १०), आयुष सेवकराम नेवारे (वय १०), जीवनकला अविनाश नेवारे (वय ४२), दर्पण महेश राऊत (वय ११), पार्वता भागवत राऊत (वय ६०), सविता रोशन बागडे (वय २५), मीराबाई नीलकंठ हेमने (वय ३३), प्रतीक्षा अविनाश नेवारे (वय २३), दिव्या उमेश मेंढे (वय १४), अंतरिक्ष दिगंबर राऊत (वय १८), विजया विष्णू कोवे (वय ६५), रिंकल रोशन बागडे (वय ३), श्रेयांस दिनेश बागडे (वय ६), सलोनी महेश राऊत (वय १६), कुणाल उमेश मेंढे (वय १४ सर्व रा. येरंडी देवलगाव), चिपेश्वर सुरेश पातोडे (वय १८, रा. परसोडी), कल्याणी विश्वनाथ दुधकुवर (वय १६, रा. चोप कोरेगाव) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच आमदार राजकुमार बडोले यांनी ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन सर्व जखमींची भेट घेतली.

कोट
मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात आला. ज्यांच्या प्रकृतीला संभाव्य धोका आहे,अशा सहा रुग्णांना पुढील उपचारासाठी केटीएस जिल्हा रुग्णालय गोंदिया येथे उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.
-डॉ. प्रदीप आनंद, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, नवेगावबांध.
………………….