24.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ पोलिसांच्या निवासस्थानासाठी दोन हजार कोटी– देवेंद्र फडणवीस

पोलिसांच्या निवासस्थानासाठी दोन हजार कोटी– देवेंद्र फडणवीस

0
21

 

नागपूर, दि. 2 :  पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सर्वसुविधा असलेले निवासस्थाने असावी यासाठी मागील दोन वर्षात सर्वाधिक 30 हजार निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. नागपूर-नाशिकसह वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या पोलिसांसाठी निवासस्थाने बांधण्यासाठी पोलिस गृहनिर्माणासाठी दोन हजार

कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बजाजनगर येथील नवीन पोलिस स्टेशनचे उद्घाटन तसेच पोलिस कर्मचाऱ्यांसाठी गिट्टीखदान परिसरात 280 घरकुल बांधण्याचा शुभारंभ मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, कृष्णा खोपडे, गिरीष व्यास, डॉ.मिलिंद माने, विकास कुंभारे, विभागीय आयुक्त अनूप कुमार तसेच पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, सहपोलिस आयुक्त संतोष रस्तोगी,नासुप्रचे विश्वस्त भूषण सिंगणे, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम,माजी महापौर मायाताई इवनाते आदी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.