गोंदियात महात्मा फुल्यांची जयंती उत्साहात
क्रांती सूर्याचा -जन्म झाला ज्योतिबा फुल्यांचा या संगीताच्या तालात मिघाली मिरवणूक.
गोंदिया ता. 12:- क्षुद्र शिकणार नाहीत, त्यांनी त्यांच्या जातीनुसार कामधंदे करावे अशी व्यवस्था असताना, पेशवाईचा नायनाट झाल्यामुळेच महात्मा ज्योतिबा फुल्यांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला,त्यामुळेच आम्हीही शिकू शकलो असा ठाम विश्वास विद्वान वक्ते अजाब शास्त्री यांनी व्यक्त केला. येथील मरार समाज भवनात आयोजित महात्मा फुल्यांच्या 199 जयंती प्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्री बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मरार समाज कल्याण समितीचे अध्यक्ष आत्माराम पाचे हे होते. मंचावर डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद भावे, सहयोग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक रमन रामादे, मनोज भांडारकर ( सी.ए. ), नगरसेवक अमर रंगारी, सुनील भरणे उपस्थित होते.
अजाब शास्त्री पुढे बोलताना म्हणाले की, या देशात महिलांना शिक्षण नव्हतं, फुल्यांच्या विचारात क्षुद्र आणि अति क्षुद्र हे दोनच शब्द मिळतात. भारतीय संविधान लागू झाल्यानन्तर क्षुद्राना ओ.बी.सी.समजण्यात आलं, त्यापूर्वी ते क्षुद्र म्हणूच त्यांची गणना होती. महाभारत काळात गुरु द्रोणाचार्य यांनी एकलव्य हा आदिवासी असल्यामुळे त्याला धनुर्विद्येचे शिक्षण नाकारलं एवढी वाईट अवस्था होती . या देशात इंग्रज येऊन चाललेही गेले असते परंतु आम्हाला शिकविलं असतं कोणी? असा प्रश्न उपस्थित करुण शास्त्री पुढे म्हणाले की,शिक्षण म्हणजे प्रश्न निर्माण करण्याचा मार्ग होय, जे प्रश्न निर्माण करीत नाहीत ते आपला फक्त उदरनिर्वाह करतात.
महात्मा फुले हे सामाजिक परिवर्तनाचे जनक आहेत असे सांगून शास्त्री म्हणाले की,त्यांनी सावित्रीमाईला शिकवलं,फुल्यांनी पाण्याचा हौद खुला केला. सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवा विवाह सुरु केलं,ते पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटना म्हणजे महात्मा फुल्यांचे आंदोलन होय. कारण महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबील लिहलं हे फुल्यांच्याच विचारातून लिहलं गेलं असे ते म्हणाले . दीनबंधू वृत्तपत्राच्या माध्यमातून महात्मा फुल्यांनी विषमतेला खड्ड्यात पुरलं, परिणामी सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत ओबीसी समाजाने पुढे यावे असे आवाहन त्यांनी केलं. महात्मा फुल्यांचे आंदोलन हे क्षुद्राच्या शिक्षणासाठी असताना हे आंदोलन हाणून पाडण्यासाठीच आता शाळा बंद करण्याचा सपाटा महाराष्ट्र शासनाने सुरु केला आहे. यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.या प्रसंगी नगरसेवक सुनील भरणे यांनीही मार्गदर्शन केलं.
दरम्यान गोंदिया शहरात रॅलीचे आयोजन करुण क्रांती सूर्याचा – जन्म झाला ज्योतिबा फुल्यांचा या संगीताच्या तालावर तरुणाई थिरकली.कार्यकर्त्यांच्या हातातील निळे,पिवळे झंडे डऊलाणे डोलत होते.विविध ठिकाणी महापुरुषांना माल्यार्पण करुण अभिवादन करण्यात आलं.
कार्यक्रमाचे संचालन श्री देशमुख यांनी करुण श्री ठाकरे यांनी आभार मानलं.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी,डॉ आंबेडकर सार्व.जयंती समिती आणि मरार समाज कल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.




