26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ कुपोषण निर्मूलनासाठी समन्वय व प्रभावी अंमलबजावणी गरजेची : डॉ. दिपक सावंत

कुपोषण निर्मूलनासाठी समन्वय व प्रभावी अंमलबजावणी गरजेची : डॉ. दिपक सावंत

0
45

गोंदिया, दि.13 : कुपोषण निर्मूलनासाठी समन्वय व प्रभावी अंमलबजावणी गरजेची असल्याचे टास्क फोर्स कुपोषण निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक सावंत देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाचा दौरा करताना म्हणाले. यानंतर टास्क फोर्स कुपोषण निर्मूलन, संसर्गजन्य आजार, बालमृत्यू तसेच गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या आजारांबाबत सविस्तर आढावा बैठक पार पडली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी टास्क फोर्स कुपोषण निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक सावंत होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. सावंत म्हणाले की, “कुपोषण निर्मूलनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे. बालमृत्यू व संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक दक्ष राहून प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच गर्भवती महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले.

बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय गोंदिया डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, डॉ. खोब्रागडे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गगन गुप्ता व डॉ. ललित कुकडे उपस्थित होते. याशिवाय रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आढावा बैठकीत कुपोषण निर्मूलनासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.