चित्रा कापसे/तिरोडा-गावातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी व शेतमजूर यांच्यासाठी महसूल विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान समाधान शिबिर दिनांक १७ एप्रिल रोजी जि. परिषद उच्च प्राथमिक शाळा, सरांडी येथे भव्य पटांगणावर पार पडले.
या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नारायण ठाकरे होते. यावेळी ना. त. निंबेकर साहेब, मंडळ अधिकारी रहांगडाले मॅडम, ग्राम महसूल अधिकारी आनंद भुते, कु. एस. ओ. बनसोड, कु. रिता बोपचे, कु. बी. डी. पटले तसेच सरांडीच्या सरपंच मिता दमाहे, खोपडा/इसापूरच्या सरपंच निशा बावनकर, पोलीस पाटील लांजेवार व महसूल कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरात महसूल विभागाच्या प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न व रहिवासी दाखले वाटप, ई-मोजणी, स्वामित्व योजना, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कृषी विभागाच्या विविध योजना, पीएम किसान, वनहक्क दावे, मतदार नोंदणी व दुरुस्ती, नैसर्गिक आपत्ती संदर्भात ई-केवायसी, आरोग्य तपासणी, नवीन शिधापत्रिका वाटप आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.याशिवाय ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत घरकुल वाटप, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा, तसेच नागरिक सुविधा एक खिडकी प्रणालीद्वारे विविध कामांचा निपटारा करण्यात आला.या शिबिरामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लोकांना मोठा दिलासा मिळाला असून शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.





