तिरोडा-डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती तिरोडा तर्फे समाजप्रबोधनकार अनिरुद्ध बनकर यांचे समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार विजयभाऊ रंहागडाले तसेच माजी आमदार भजनलाल वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम संपन्न करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अशोक असाटी, न.प.उपाध्यक्ष राजेश गुणेरिया, नगरसेवक देवेंंद्र तिवारी, तरबेज मन्सूरी, डॉ कुमुद मेश्राम,मंगला तिरपुडे,रश्मी बुराडे,छाया कटरे,आशा भोंडेकर,सुनिल पालादुरकर,सलाम शेख, तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते, या कार्यक्रमात समितीमधील मुत्यु झालेल्या कार्यकर्त्यांला श्रद्धांजली म्हणून त्यांच्या पत्नीला भेटवस्तू देऊन कार्याचा गौरव म्हणून सत्कार करण्यात आला, कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक विजय बन्सोड, जितेंद्र डहाटे,राजेश गुणेरिया,अतुल गजभिये, किशोर डहाटे, अमरदिप वहाने, विनोद चव्हाण, प्रवीण शेंडे,रामु शहारे, राहुल मेश्राम,निशांत डहाटे,बाळु सुखदेवे, विलास आगाशे,दिनेश काबंलकर,व सर्व पदाधिकारी यांनी केले.





