* मका विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी करावी
गोंदिया, दि.29 : शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी विपणन हंगाम २०२५-२६ मधील मका विक्री करण्यासाठी शासनाचे अधिकृत बीम (BEAM) पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी ०१/०४/२०२६ ते ३०/०४/२०२६ या कालावधीत करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. तसेच, मका विक्रीसाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन, ९ अतिरिक्त मका खरेदी केंद्रे वाढविण्यात आली असून, पूर्वीच्या ८ केंद्रांसह एकूण १७ मका खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.
अतिरिक्त मका खरेदी केंद्र : गोरेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. गोरेगाव, माँ वैष्णवी महिला बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्या. गिरोला अंतर्गत गिरोला हेटी ता.सडक अर्जुनी, गहाणे शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्या. फुटाळा ता.सडक अर्जुनी, दि महिला औद्योगिक उ. सहकारी संस्था मर्या. सडक अर्जुनी अंतर्गत भादुटोला, प्रियंका महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्या. डुंडा/पांढरी अंतर्गत गोंगले ता.सडक अर्जुनी, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभि. बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्या. कोकणा/जमी अंतर्गत पिपरी ता.सडक अर्जुनी, गणेश अटल अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या. सिरेगावबांध ता.अर्जुनी मोरगाव, कृषक शेतकी उ.सा.सा.पु व खरेदी विक्री सहकारी संस्था मर्या. भिवखिडकी ता.अर्जुनी मोरगाव, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. अर्जुनी मोरगाव (विविध).
जिल्ह्यातील सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता आवश्यक कागदपत्रांसह जसे- रब्बी पणन हंगाम २०२५-२६ चा पीक पेरा नोंद असलेला ऑनलाईन ७/१२ उतारा व नमुना ८, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, सामुहिक 7/12 उतारे असल्यास उताऱ्यावरील इतर व्यक्तींचे सहमती पत्र व आधार कार्ड इत्यादी.
वरील शासकीय मका खरेदी केंद्रांवर जाऊन ३०/०४/२०२६ पर्यंत मका विक्रीसाठी ऑनलाइन शेतकरी नाव नोंदणी पूर्ण करावी आणि शासकीय मका खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्यामार्फत करण्यात येत आहे.





