23.8 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ विदर्भ साहित्य संघ,गोंदिया शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. राजीव कोलते तर दिपक वेरुळकर सचिव

विदर्भ साहित्य संघ,गोंदिया शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. राजीव कोलते तर दिपक वेरुळकर सचिव

0
73

​गोंदिया,दि.०५-विदर्भ साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘विदर्भ साहित्य संघ’ शाखा गोंदियाच्या सन २०२६ ते मार्च २०३१ या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नव्या चमूमध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून डॉ. नितीन कोतवाल यांची तर अध्यक्षपदी डॉ. राजीव कोलते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.​साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी वचनबद्ध असलेल्या या कार्यकारिणीत अनुभवी आणि उत्साही सदस्यांचा मेळ घालण्यात आला आहे.
​​संस्थेच्या उपाध्यक्षपदी माणिक गेडाम आणि सौ. विणा आचार्य यांची निवड झाली असून, सचिवपदाची महत्त्वाची धुरा दिपक वेरुळकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सहसचिव म्हणून गौरव धोटे व अरविंद बरडे कार्य पाहणार आहेत. आर्थिक नियोजनाची जबाबदारी कोषाध्यक्ष म्हणून प्रकाश उमाळकर सांभाळतील.
​​गोंदियातील सांस्कृतिक उपक्रमांना गती देण्यासाठी भैरवी देशपांडे यांची सांस्कृतिक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांना सहकार्य करण्यासाठी स्वाती पिंपळापुरे, चैतन्य मातुरकर आणि संगीता निगुडकर यांची सहसचिव पदी नियुक्ती झाली आहे.​याव्यतिरिक्त कायदेशीर सल्लागार म्हणून वसंत चुटे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून संजीव बापट आणि वास्तू निरीक्षक म्हणून रवीन्द्र आचार्य यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून  भाग्यश्री मार्कंडेय,रविन्द्र रहांगडाले आणि जयंत शुक्ला आपले योगदान देतील.​पुढील पाच वर्षांच्या काळात गोंदिया जिल्ह्यात दर्जेदार साहित्य संमेलने, व्याख्यानमाला, कवी संमेलने आणि नवोदित लेखकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस नूतन अध्यक्ष डॉ. राजीव कोलते यांनी व्यक्त केला आहे.​या नवनियुक्त कार्यकारिणीचे साहित्य वर्तुळातून आणि जिल्हाभरातील रसिकांकडून कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

blank