23.4 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ डाॅ.बाजेपयीचा न्यू बालाजी सोनोग्राफी सेंटर केले सील!रुग्णालयाची परवानगीही रद्द

डाॅ.बाजेपयीचा न्यू बालाजी सोनोग्राफी सेंटर केले सील!रुग्णालयाची परवानगीही रद्द

0
162

गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या न्यू बालाजी सोनोग्राफी सेंटरची तत्काळ चौकशी करून मशीन सील करण्याबाबतचे रामनगर पोलिसांचे पत्र जिल्हा शल्यचिकित्सकांना पोहोचताच सोमवारी (दि. ४) त्यांच्या आदेशानुसार पथकाने डॉ. नितेश बाजपाई याचे न्यू बालाजी सोनोग्राफी सेंटर सील केले.
येथील डॉ. नितेश बाजपाई याने मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील अनेक महिला व तरुर्णीचे बाळंतपण
आपल्या रुग्णालयात करून अनैतिक संबंधातून जन्माला आलेले बाळ लोकांना ४-४ लाखांत विक्री केले. याप्रकरणी भंडारा जिल्ह्यातील साकोली व येथील रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनगर पोलिस ठाण्यात डॉ. बाजपाई याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. या सोनोग्राफी सेंटरची रामनगर पोलिसांनी तपासणी केल्यावर त्याठिकाणी त्यांना काही कागदपत्रे न मिळाल्याने रामनगर पोलिसांनी १५ एप्रिल रोजी डॉ. पटले यांना पत्र पाठवून डॉ. बाजपेयी यांचे सोनोग्राफी सेंटर सील करण्याची विनंती केली. त्यानुसार सोमवारी (दि. ४) डॉ. पटले यांच्या सूचनेवरून निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. बी. डी.जायस्वाल, अॅड. रेखा कानतोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती किल्लासर, डॉ. संजय भगत, डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केली.

न्यू बालाजी सोनोग्राफी सेंटर सुरू करण्याची परवानगी ८ सप्टेंबर २०२५ रोजी देण्यात आली होती, या केंद्राचा नोंदणी क्र. PCPNDT/G/४७/२०२५ संदर्भ क्रमांक- १ आणि २ नुसार नितेश बाजपेई विरुद्ध पोलिस ठाणे वरठी (जि. भंडारा) अणि पोलिस ठाणे रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पटले यांनी न्यू बालाजी नर्सिंग होमची मान्यता रद्द केली आहे.

रेकॉर्ड गेले कुठे?
या केंद्राच्या चौकशी दरम्यान पोलिसांना कोणतेही रेकॉर्ड मिळाले नाही.पीसीपीएनडीटी कायदा १९९४ कलम ५,६ व नियम २ (८) आणि १० अंतर्गत सर्व दस्तावेज ठेवणे अनिवार्य आहे. तरी या केंद्राची तपासणी करून रेकॉर्ड नसल्यास केंद्र सील करून समितीने सील केल्याचा अहवाल दोन दिवसांच्या आत देण्याचे पत्र रामनगर पोलिसांनी दिले होते. बाजपेयी यांचे काळे कारनामे असलेली कागदपत्रे गायब करण्यात आली आहेत.

blank