24.5 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

0
25

अमरावती, दि.8 -मोर्शी येथील पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या एका 52 वर्षीय कर्मचाऱ्याचा तिवसा नजीकच्या कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (ता.8)रोजी सकाळी घडली.अरुण श्रीराम तायडे(वय 52,रा.त्रिमूर्तीनगर,तिवसा ) असे मृतक इसमाचे नाव आहे.ते गेल्या काही वर्षापासून तिवसा येथे कार्यरत होते.मात्र अलीकडेच त्यांची बदली मोर्शी येथील अप्परवर्धा पाटबंधारे विभागात झाली होती.आज सकाळी साडेआठ वाजताचे सुमारास अरुण तायडे हे तिवसा ते सातरगाव रोडवरील अप्परवर्धा धरणाच्या उजव्या कालव्यातून वाहत असतांना काही नागरिकांना आढळून आले,त्यांनी तायडे यांना बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.