गोंदिया,दि.१४-गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांची नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.आज १४ मे रोजी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी हे आदेश काढले असून आपल्या पदाचा पदभार त्वरीत सोपवून नवीन जागी रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत.





