गुरुवारला ओबीसींच्या ठिकठिकाणी बैठका

0
11
गोंदिया,दि.09 : राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघर्ष कृती समिती आणि महाराष्टातील सर्व ओबीसी संघटनांच्या संयुक्तरित्या ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर ओबीसींचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात जागृती अभियान सुरू झाले असून मोर्चापूर्वी जिल्ह्यातून चेतना यात्रा काढली जाईल. या अनुषंगाने बैठकांचे आयोजन आणि नियोजन सुरू आहे.उद्या बुधवार १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवरी तालुक्याची बैठक सुभाष हायस्कूल डोंगरगाव येथे होणार आहे. यानंतर दुपारी २ वाजता सालेकसा तालुक्याची बैठक स्थानिक आदिवासी सांस्कृतीक भवनात दुपारी २ वाजता व यानंतर आमगाव तालुक्याची बैठक दुपारी ४.३० वाजता डोयेवाडा आमगाव येथे आहे. समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी सेवा संघाच्यावतीने करण्यात आले आहे.