काचेवानीला मिळणार मिनरल वॉटर

0
6

गोंदिया दि.11:: तिरोडातील अदानी प्रकल्पाद्वारे संचालित अदानी फाऊंडेशनच्या वतीने परिसरातील नागरिकांच्या विविध सोयीसुविधांचा भाग म्हणून आता काचेवानीत पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी ‘आरओ वॉटर प्लॅन्ट’ लावला जात आहे. त्याचे उद््घाटन शुक्रवारी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते होणार आहे.
सीएसआर निधीअंतर्गत अदानी फाऊंडेशनकडून परिसरातील दत्तक गावांसह इतरही ठिकाणी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातून या भागातील गावांचा कायापालट होत आहे. काचेवानीत उभारण्यात आलेल्या पाणी शुद्धीकरण प्लान्टमधून दररोज १0 हजार लिटर शुद्ध पाणी गावकर्‍यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे हा प्लान्ट अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित आहे. या पाण्याचा वापर काचेवानीसह परिसरातील इतरही गावांना नाममात्र शुल्कावर करता येणार आहे. या शुद्ध पाण्यामुळे पाण्यातून होणार्‍या अनेक आजारांवर नियंत्रण येणार आहे. अदानी फाऊंडेशनने गोंदियाच्या वनविभागाला एक सुसज्ज अशी रेस्क्यू व्हॅनही शुक्रवारी दिली जाणार आहे. उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर ती व्हॅन स्वीकारतील.