23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ वातावरण बदलामध्ये धानाची पेरीव पध्दत फायदेशीर – डॉ. उषा रा डोंगरवार

वातावरण बदलामध्ये धानाची पेरीव पध्दत फायदेशीर – डॉ. उषा रा डोंगरवार

0
32

कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे पेरीव धान पध्दतीवर कार्यशाळा व प्रात्यक्षिक संपन्न.

भंडारा,दि.26:चालू वर्ष हे अल निनोच्या प्रभावाखाली असून यामूळे येणारे पर्जन्यमान कमी असण्याची शक्यता दर्शवली जात आहे, तसेच धान शेतीत वाढणारी मजूर टंचाई व उत्पादन खर्चात दिवसेनदिवस होणारी वाढ यावर उपाय म्हणून कृषी विज्ञान केंद्र साकोली कृषी संशोधन केंद्र, नवेगाव बाँध, बायर डायरेक्ट एकर्स व कृषी विभाग, साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय कार्यशाळा व प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे आयोजीत करण्यात आले होते.

 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ताराचंदजी लांजे, अध्यक्ष, शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने राजू नंदनवार,लिड बँक मॅनेजर, प्रमुख मांर्गदर्शक किशोरजी पात्रीकर, उपविभागिय कृषी अधिकारी,  आदित्य घोगरे, तालुका कृषि अधिकारी योगेश महल्ले, विषय विशेषज्ञ कृषी अभियांत्रिकी, लयंत अनित्य, विषय विशेषज्ञ हवामानशास्त्र, महेंद्र जामूनपाने, क्लस्टर इंचार्ज, बायर डायरेक्ट एकर्स, डॉ. रामचंद्र साबळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवामान विभाग पुणे व डॉ. उषा रा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र  यांच्यासह साकोली, लाखंदूर या तालूक्यातील १०५ प्रगतशील शेतकरी उपस्थीत होते.

कार्यक्रमाची सुरवात डॉ. पंजाबराव देशमूख यांच्या प्रतिमेची पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. प्रशांत उंबरकर यांनी केली. तांत्रीक मार्गदर्शनामध्ये लयंत अनित्य यांनी अलनिनोचा प्रभाव व त्यावरील सांभाव्य बाबीवर मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. रामचंद्र साबळे यांनी आभासी पद्धतीने यावर्षी येणा-या पर्जन्यमानाचे अनुमान व त्यानुसार लागवड करावयाच्या पीक पध्दती यावर सखोल मार्गदर्शन केले. वातावरण बदलामध्ये अधिक धान उत्पादनासाठी पेरीव पध्दत कशी महत्वाची हे सादरीकरणासह योगेश महल्ले यांनी केले  महेंद्र जामुननपाने, क्लस्टर इंचार्ज, बायर डायरेक्ट एकर्स यांनी बायर कंपनीने मागील चार वर्षात कृषिविज्ञान केंद्रासोबत केलेल्या पेरिव धान पध्दतीमधे केलेले विविध प्रयोग व त्याचे अनूभव शेतक-यांना सांगीतले.किशोर पात्रीकर यांनी पेरीव धान पध्दत व पेरणी करताना घ्यावयाची काळजी व बारकावे यावर सखोल मार्गदर्शन केले.  राजू नंदनवार लिड बँक मॅनेजर यांनी शेतक-यांना शेती कर्जा व त्याची परतफेड याबाबत जागृत करून यावर्षी येणा-या कर्जवाटपाची सविस्तर माहिती दिली. यांनंतर डॉ. उषा डोंगरवार यांनी पेरिव धान पध्दतीमध्ये कृषी विदयापीठाच्या शिफारशी व नविन वाण याबाबत मार्गदर्शन करून खताच्या संतूलीत वापराबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ताराचंद लंजे यांनी धान शेती बरोबर भाजीपाला व फळपिके लागवड करून शेतक-यांनी आपली उपजिविका भागवावी असे सांगितले.

यांनतर उपस्थीत शेतक-यांमधून पेरिव पध्दतिने धान लागवड करीत असलेल्या शेतक-यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये घनश्याम पारधी, किन्ही मोखे, गिरीधर कापगते, उमरझरी, एकनाथ शेंडे, मुंडीपार, संजय कापगते, बाम्पेवाडा यांचा समावेश होता. यानंतर बीज गुणन प्रक्षेत्रावर पेरणी यंत्राने धान लागवड करून दाखवण्यात आली. त्यामध्ये उपस्थित शेतक-यांनी आपल्या समस्या मांडल्या व प्रत्यक्ष पेरणीतून समस्याचे समाधान करून घेतले. तसेच प्रक्षेत्रावर धान रोवणी यंत्राने लागवडीबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पर्वते तर महल्ले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या पुर्ततेसाठी भगत, कु. तायडे, पवार, गायकवाड, सुखदेवे, लांजेवार यांनी प्रयत्न केले. यावर्षी अल निनो चा प्रभाव पाहता शेतकरी बांधवांनी पेरिव धान पध्दतीन लागवड करावी असे आवहन डॉ. उषा डोंगरवार यांनी केले आहे.

blank