23.8 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ सोनखास हेटी जंगलात आढळला बिबट्याचा मृतदेह

सोनखास हेटी जंगलात आढळला बिबट्याचा मृतदेह

0
37

यवतमाळ,दि.12-वाघापूर टेकडी उपवन क्षेत्रांतर्गत लखमापूर बीटमधील सोनखास हेटीजवळ काही नागरिकांना बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. बिबट्याचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत होते. हा बिबट्या साडेचार वर्ष वयाचा आहे. गावकर्‍यांनी याची माहिती यवतमाळ येथील वन विभागाच्या कार्यालयाला दिली. यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्याला पुरण्यात करण्यात आले. विशेष म्हणजे वन विभागाच्या अधिकार्‍यांना कुजलेल्या बिबट्याचा शोध ४ दिवसांपर्यंत लागू नये याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

blank