38.2 C
Gondiā
Thursday, June 11, 2026
Home विदर्भ मातोश्री पांदण रस्ते योजनेमुळे नागरा व आवरीटोल्यातील नागरिकांच्या समस्या सुटल्या

मातोश्री पांदण रस्ते योजनेमुळे नागरा व आवरीटोल्यातील नागरिकांच्या समस्या सुटल्या

0
33

blank

गोंदिया,दि.११ःमातोश्री ग्राम समृद्धी शेत/पांदण रस्ते योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी बारमाही पक्के रस्ते उपलब्ध होत आहेत, ज्यामुळे चिखलाच्या त्रासातून सुटका होऊन शेतीमाल वाहतूक सुलभ झाल्याने गावकरी व शेतकरी वर्ग अत्यंत आनंदित झाल्याचे चित्र गोंदिया तालुक्यात बघावयास मिळत आहे.तालुक्यातील आवरीटोला नांगरा गावातील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली असून ‘मातोश्री पांदन रस्ते’ योजनेअंतर्गत झालेल्या रस्ते बांधकामामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे,नागरा गावातील ग्रामस्थांना मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे जाण्याकरीता चांगला रस्ता नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असायचे.अनेकदा तर दुसऱ्या गावातील स्मशानभूमीवर गावातील मृतदेह नेऊन अग्निसंस्कार करण्याची वेळ आलेली होती.मात्र मातोश्री पांदण रस्त्यामुळे नागरा येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरणासह चांंगला दर्जदार तयार करण्यात आल्याने ग्रामस्थांना विभागाचे व सरकारचे अभिनंदन केले आहे.नागरा येथील सामाजिक कार्यकर्ते ओबीसी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी राजेश नागरीकर,भरत लिल्हारे यांच्यासह ग्रामपंचायतने स्थानिक आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे पाठपुरावा करुन रस्ता बांधकामाची मागणी केली होती.आमदार अग्रवाल यांनी ग्रामस्थांच्या समस्येला प्राधान्य देत ‘मातोश्री पांदन रस्ता’ योजनेतून निधी मंजूर सदर रस्त्याचे बांधकाम स्थानिक मजुरांकडून करून घेण्यात आले, ज्यामुळे ग्रामस्थांना रोजगारही मिळाला  व स्मशानभूमिकडे जाणारा रस्ताही तयार झाला.