26.5 C
Gondiā
Monday, July 20, 2026
Home विदर्भ लोधी समाजाचा केंद्राच्या ओबीसी यादीत समावेश करण्याची मागणी; खासदार राजेंद्र जैन यांना...

लोधी समाजाचा केंद्राच्या ओबीसी यादीत समावेश करण्याची मागणी; खासदार राजेंद्र जैन यांना निवेदन

0
41

तिरोडा-महाराष्ट्र राज्यातील लोधी समाजासह ३२ उपजातींला केंद्र सरकारच्या इतर मागासवर्गीय (OBC) यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी करत खासदार राजेंद्र जैन यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीयांच्या राज्य यादीमध्ये ३३ उपजातींचा समावेश असून त्या समाजाला राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ मिळत आहे. मात्र केंद्राच्या ओबीसी यादीत नाव नसल्याने या समाजाला केंद्र सरकारच्या शैक्षणिक, नोकरी व इतर कल्याणकारी योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने संबंधित समाजाच्या प्रतिनिधींची सुनावणी घेतली असून, महाराष्ट्र शासनानेही शिफारस करून हे प्रकरण केंद्र शासनाकडे पाठविले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय इतर मागासवर्ग आयोगाने सकारात्मक विचार करून लोधी समाजासह सर्व उपजातींचा केंद्राच्या ओबीसी यादीत समावेश करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी समाजाच्या विविध उपजातींचा समावेश करण्याची मागणी करत खासदार राजेंद्र जैन यांना निवेदन सादर करण्यात आले. समाजाच्या प्रतिनिधींनी या विषयावर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून समाजाला न्याय मिळवून देण्याची विनंती केली.याप्रसंगी समाजाचे जिल्हाध्यक्ष कुंदन कटारे, महामंत्री राधेश्याम नागपुरे, शिवकुमार नागपुरे, घनश्याम मस्के, रमेश मुटकुरे, विवेक मस्करे, महेन्द बघेले, शुभम नागपुरे, मुकेश लिल्हारे,सोमेश उपबंशी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या न्याय्य मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

blank