24.4 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ तहसिल कार्यालयावर धडकला जनता दलाचा भव्य मोर्चा

तहसिल कार्यालयावर धडकला जनता दलाचा भव्य मोर्चा

0
25

चांदुर रेल्वे,दि.05-श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना, अपंग निराधार योजनेची पेन्शन ६०० रुपयांवरुन १००० रुपये करा या मागणीकरीता जनता दल सेक्युलर चांदुर रेल्वे तर्फे तहसिल कार्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष महा. राज्य तथा माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले यांनी केले. यावेळी शेकडो महिला, शेतकरी, शेतमजुंराची  प्रामुख्याने उपस्थीती होती.