दाते संस्थेच्या पुरस्कारसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन 

0
18

वर्धा : यशवंतराव दाते स्मृती संस्थेने  गेल्या २८ वर्षांपासून  सातत्याने व्याख्यानमाला आयोजित करून वैचारिक प्रबोधन आणि  आपल्या साहित्यिक , सांस्कृतिक , सामाजिक व शैक्षणिक  उपक्रमांद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केला आहे . 
 यासंस्थेच्या वतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट मराठी कादंबरीला बाबा पदमनजी  साहित्य पुरस्कार ,  सर्वोत्कृष्ट  कथासंग्रहाला  शिक्षण व सहकार महर्षी  बापूरावजी देशमुख पूरस्कार . सर्वोत्कृष्ट कवितासंग्रहाला संत भगवानबाबा काव्य पुरस्कार , बालसाहित्यासाठी  पदमाकर श्रावणे स्मृती  बालसाहित्य  पुरस्कार  व  भाऊराव शिंगाडे स्मृती विनोदी साहित्य पुरस्कार  दिला जातो . या सर्व पुरस्काराचे  स्वरूप  रोख पाच हजार रुपये असे असून,  अंजनाबाई  इंगळे तिगावकर स्मृती  स्त्रीवादी साहित्य पुरस्कार  रोख दहा हजार रुपये , मानपत्र व स्मृतिचिन्ह असे  आहे . 
सर्व पुरस्कारासाठी लेखक तसेच प्रकाशकांनी  जानेवारी १५ ते डिसेंबर २०१६ या दोनवर्षाच्या कालावधीत  मराठीत प्रकाशित प्रत्येक साहित्य प्रकाराच्या  दोन प्रती  ५ जानेवारी २०१७  पूर्वी  पुढील पत्त्यावर पाठवाव्यात . सोबत लेखकाचा संक्षिप्त परिचय छायाचित्रासह संयोजक , साहित्य पुरस्कार समिती  प्रा. राजेंद्र  मुंढे , द्वारा अध्यक्ष प्रदीप दाते , शिवबावाडी , साबळे प्लॉट्स , बॅचलर रोड , वर्धा ४४२००१ .  या पत्त्यावर  पाठवावा ,  अथवा अधिक माहितीसाठी ०७१५२-२४१०५१ , २५२५१०, ९४२२१४४८१७ वर  संपर्क करावा . असे संस्थाध्यक्ष प्रदीप दाते सचिव संजय इंगळे यांनी कळविले आहे.