संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे साखळी उपोषण

0
19

चंद्रपूर,दि.05- हिवाळी अधिवेशनादरम्यान चंद्रपूर येथे संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील 17 मागण्यांना घेऊन साखळी उपोषणाला आज(दि.05)पासून सुरवात करण्यात आली आहे.यामध्ये जिल्यात प्रदूषणामुळे वाढते गंभीर आजारामुळे चंद्रपूर जिल्ह्याला प्रदूषण ग्रस्त जिल्हा घोषित करावा.वीज केंद्राच्या प्रदूषणामुळे त्रस्त जनतेला वीज बिलात 50% सबसिडी देण्यात यावी.
चंद्रपूर जिल्ह्यातील उधोग व सि.टी.पी.एस. मध्ये स्थानिकांना 80% नौकरी देण्याबाबत कडक अंमलबजावणी करण्यात यावी.जिल्हा परिषद मनपा, नागरपरिषेदाच्या शाळेत कॉन्व्हेंट च्या दर्जाचे शिक्षणाची सोई सुविधा देण्यात यावी.गोंडवाना विद्यापीठाची परीक्षा फी व ऍडमिशन फी कमी करावी.प्रदुषण ग्रस्त आजारी नागरिकांसाठी मल्टि स्पेसिअलिस्ट हॉस्पिटल सुरु करावे.प्रदूषण शहर भारतातील सर्वात जास्त प्रदूषित शहर असल्याने प्रदुषण मंडळाचे खंडपीठ चंद्रपूर येथे देण्यात यावे.सध्या स्थितीत आरक्षणाला हात न लावता जनसंख्या जाहीर करून त्यानुसार आरक्षण द्यावे व भारतीय संविधानाची अमल बाजावणी करण्यात यावी.प्रदुषण मंडलाचे अधिकारी प्रदूषण करण्याऱ्यावर उधोगांवर कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी.मनपाने शिक्षण , सफाई कर रद्द करावे.चंद्रपूर शहरातील जुनी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन बदलविण्यात यावी.अल्पावधीत खड्डे पडलेले रस्ते तयार करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे . रस्ते दुरुस्ती करावे .जटपुरा गेटला लागून आतील भागास असलेल्या खुल्या जागेत महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात यावे.सरई मार्केटमध्ये शिवाजी महाराज पुतळा , शॉपिंग कॉम्प्लेक्स व वाचनालय उभारण्यात यावे.चंद्रपूर शहराला रिंग रोड तयार करण्यात यावा व जटपुरा गेट मधील वाहतूक समस्या त्वरित सोडवावी.चंद्रपूर जिल्ह्यातील सदोष वीज मीटर बद्लवून दयावे.चंद्रपूर महानगर पालिकेच्या हद्दीत असलेले ओपन स्पेसचे गार्डन व सौंदर्यी करन करण्यात यावे,या मागण्यांचा समावेश आहे.या मागण्यांची शासनाने दखल घेऊन त्वरित सोडवावे अन्यथा संस्थेच्यावतीने जन आंदोलन उग्र करण्याचा इशारा दिला आहे.