24.8 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ २४ डिसेंबरला अरबी समुद्रात छत्रपतींच्या भव्य स्मारकाचे भूमीपूजन

२४ डिसेंबरला अरबी समुद्रात छत्रपतींच्या भव्य स्मारकाचे भूमीपूजन

0
26

गोंदिया,दि.२०-मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाèया छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमीपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याची माहिजी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रपरिषदेत दिली.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार असून ७० नद्यांचे पाणी व गडकिल्यांची माती राज्यातील विविध भागातून आणली जाणार आहे.त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील ८ नद्यांचे पाणी व प्रतापगड,कचारगड व गडमाता येथील माती सुध्दा नेण्यात येणार असल्याचे म्हणाले.पहिल्या टप्यामध्ये २३०० कोटी रुपये खर्च करुन २१० मीटर उंची असलेला पुतळा उभारण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केली. पत्रपरिषदेला जि.प.अध्यक्ष उषा मेंढे,आमदार विजय रहागंडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार,पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपूरे आदी उपस्थित होते.

blank