३१ मार्चपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प

0
7

गोंदिया,दि.२० :जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाअंतर्गत मार्च २०१७ पर्यंत संपूर्ण गोंदिया जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प २० डिसेंबर रोजी झालेल्या हागणदारीमुक्त गोंदिया जिल्हा संकल्प मेळाव्याप्रसंगी घेण्यात आला.या मेळाव्याचे आयोजन कटंगीकला येथील मयूर लॉन येथे करण्यात आले होते.संकल्प मेळाव्याचे उदघाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे होत्या.
कार्यक्रमाला खासदार नाना पटोले,आमदार विजय रहागंडाले,जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार,पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे,महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपूरे,कटंगीकला सरपंच कांता नागरीकर,आमगाव,सालेकसा येथील पंचायत समितीचे सभापती उपस्थित होते.
पालकमंत्री बडोले यांनी आपला जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्हा असून विदर्भात हागणदांरीमुक्त जिल्हा होण्याचा पहिला मान आपल्याला मिळवायचा असल्याने येत्या ३१ मार्चपर्यंत प्रत्येक गावामध्ये शौचालयांचे बांधकाम पुर्ण करुन त्याचा वापर करण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्याचे आवाहन केले.५५६ ग्रामपंचायतीपैकी ३५६ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्याचे सांगत डासमुक्त गाव आणि कॅशलेस गाव सुध्दा आपल्याला बनवयाचे आहे,यासाठी ग्रामसेवक,सरपंच व सदस्यांनी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे म्हणाले.
यावेळी खासदार नाना पटोले यांच्यासह सर्वच मान्यवरांनी विचार व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या संपुर्ण स्वच्छता विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मोठयाप्रमाणात ढिसाळपणा आढळून आला.खुच्र्या रिकाम्या असतानाही ग्रामसेवक हे उभे होते.गप्पा मारत बसले तरीही कुणाचे लक्ष नव्हते.विशेष म्हणजे या विभागाच्या प्रमुखाचा संपर्क हा जनसामान्यासारखा असला पाहिजे परंतु तसा दिसून आला नाही.त्यातच या मोठ्या कार्यक्रमाचे निमंत्रण पत्र सुध्दा वृत्तपत्राच्या कार्यालयापर्यंत पोचविण्याची साधी तसदी न घेतले नसल्याचे आढळून आले.