धान उत्पादक शेतकèयांना मिळणार प्रति क्विंटल दोनशे रुपये प्रोत्साहन अनुदान

0
6

मुख्यमंत्री फडणवीस व ना. बडोले यांचे भाजपाकडून आभार
गोंदिया,दि.11 : आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत २०१६-१७ या हंगामामध्ये खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा दोनशे रुपये प्रति qक्वटल अतिरिक्त प्रोत्साहन राशी देण्याचा निर्णय राज्य शासनाने १० जानेवारी रोजी घेतला आहे. धान उत्पादन खर्चामुळे अडचणीत आलेल्या पूर्व विदर्भातील शेतकèयांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून धान उत्पादक शेतकèयांच्या हिताचा विचार सातत्याने करीत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष हेमंत पटले व सर्व पदाधिकारी कार्यकत्र्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे आभार मानले आहे.
केंद्र शासनाने हंगाम २०१६-१७ साठी साधारण धानासाठी १४७० रुपये प्रति qक्वटल व अ ग्रेड धानासाठी १५१० रुपये प्रति qक्वटल अशी आधारभूत किंमत ठरविली होती. या आधारभूत किंमतीपेक्षा जास्त किंमत देण्यात येणार नसल्याचे ठरविले होते. मात्र, धान उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. ती अडचण ओळखून शेतकèयांच्या हितासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले हे सातत्याने प्रयत्न करीत होते. ना. बडोले यांच्या प्रयत्नाला यश आले असून राज्य शासनाने वरील आधारभूत किंमतीमध्ये प्रति qक्वटल २०० रुपये अतिरिक्त रक्कम प्रोत्साहनपर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय १० जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आला. सदर अतिरिक्त प्रोत्साहनपर राशी ही प्रति शेतकरी ५० qक्वटल धानाच्या मर्यादेपर्यंत मिळणार असून ती शेतकèयांना रेखांकित धनादेशाद्वारे मिळणार आहे. धान उत्पादक शेतकèयांना दिल्या जाणाèया प्रोत्साहनपर राशीसाठी सुमारे ६६ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार शासनावर पडणार असून शासनाने सदरील खर्चालाही मंजूरी दिली आहे. सदरील प्रोत्साहन राशी सन २०१६-१७ च्या हंगामात २४ ऑक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत खरेदी होणाèया धानासाठीच लागू राहणार आहे. राज्यातील विशेषत: धान उत्पादक शेतकèयांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, तसेच यासाठी लागणाèया आवश्यक कागदपत्रांची सातबारा उताèयाची पूर्तता करावी, असे आवाहन भाजपातर्फे करण्यात आले आहे.