27.3 C
Gondiā
Friday, July 10, 2026
Home Top News खुशखबर… जवान चंदू चव्हाणची पाककडून सुटका

खुशखबर… जवान चंदू चव्हाणची पाककडून सुटका

0
26

नवी दिल्ली, दि. २१ – नजर चुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेले जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तानातून सुटका होणार असून दुपारी ३ वाजता ते वाघा बॉर्डवर पोहोचतील.
8 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळे उद्ध्वस्त केली. यानंतर काही वेळाने चंदू चव्हाण यांनी नकळत नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले, अशी माहिती समोर आली होती. भारतीय सैनिक पकडल्याची माहितीही पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली होती.