30.7 C
Gondiā
Saturday, July 4, 2026
Home विदर्भ समग्र ब्राम्हण सभेचे सत्कार समारोह आज

समग्र ब्राम्हण सभेचे सत्कार समारोह आज

0
19

गोंदिया :समग्र ब्राम्हण सभा गोंदियातर्फे जिल्ह्यातील संपन्न झालेल्या विविध निवडणुकीत यशस्वी ठरलेल्या सदस्यांचे अभिनंदन करण्याकरिता उद्या २६ जानेवारी रोजी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. राजस्थानी ब्राम्हण समाजाच्या सभागृहात दुपारी ४ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी न.प. तिरोड्याच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सोनाली देशपांडे, जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष सचिन मिश्रा, नवनिर्वाचित नगरसेवक शिवकुमार शर्मा, दीपक बोबडे, सुनील तिवारी, निर्मला मिश्रा, श्वेता पुरोहित, विवेक मिश्रा, जिल्हा मजूर संघाचे संचालक अरूण दुबे, जिल्हा बेरोजगार संघाचे संचालक भारत शुक्ला यांचे सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी समग्र ब्राम्हण सभेच्या सर्व सदस्यांनी व समाजबांधवांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समग्र ब्राम्हण सभेच्या वतीने करण्यात आले आहे.