दहा ग्रामसेवकांना ‘कारणे दाखवा’

0
18

गोंदिया,दि.25-वैयक्तिक शौचालय बांधकामात दुर्लक्ष करणार्‍या जिल्ह्यातील दहा ग्रामसेवकांसह दोन गटविकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. गणतंत्र दिनापूर्वी ग्रामपंचायत हागणदारीमुक्त झाली नाही, तर या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याने ग्रामसेवकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
स्व. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात शुक्रवारी (ता.२0) जिल्ह्य़ातील ५२ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हा परिषदेचे प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख उपस्थित होते.
शासनाच्या निर्देशानुसार २0१६-१७ मध्ये गोंदिया जिल्हा हागणदारीमुक्त करावयाचा आहे. जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, राजेश देशमुख यांनी आत्तापर्यंत तालुका स्तरावर ग्रामसेवकांच्या चारवेळा सभा घेतल्या. वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम डिसेंबर २0१६ अकेर पूर्ण करण्याचे या बैठकीत निर्देश देण्यात आले. शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली.
त्यानुसार जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची विशेष आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीतील आढाव्यानुसार आमगाव तालुक्यातील तीन, अर्जुनी मोरगाव आणि गोंदिया तालुक्यातील ्रपत्येकी दोन तथा देवरी येथील तीन ग्रामसेवकांनी वैयक्तिक शौचालय बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आले.