धम्म आचरनातून जगलो पाहिजे : ना. बडोले

0
10

– आठव्या अशोक स्तंभाचे भूमिपूजन
– भिमघाट येथे आयोजित सोहळा
गोंदिया, दि.२५:महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा संपूर्ण मानव जातीचा विकासाचा धम्म आहे. सम्राट अशोकांनी आपले संपूर्ण कुटूंब धम्माच्या प्रचारासाठी जगात पाठविले. थायलँड, जापान, श्रीलंका या देशात जावून बघितल्यावर खरा धम्म पाहायला मिळतो. फक्त स्मारक उभारल्याने धम्म मोठा होणार नाही तर तो आचरनातून आपण जगलो पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी केले.
ते २२ जानेवारी रोजी अशोक सर्वांगीण विकास सोसायटी, पुणे तर्फे पांंगोली येथील भीमघाटावर आयोजित चौदा स्तंभ उभारणीच्या संकल्पनेतिल आठव्या अशोक स्तंभाचा भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे २३ एप्रिल १९५४ ला गोंदिया येथे आगमनाचे औचित्य साधून हा स्मारक तयार होत आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोकभाऊ इंगळे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक शीलवन्त, विद्याभूषण डॉ. प्रशांत पगारे, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, नगरसेवक घनश्याम पानतावने, नवनिर्वाचित नगरसेविका देविका रुसे, कुंदाताई पंचबुद्धे, विष्णु नागरिकर, झामसिंग येरणे, रतन वासनिक, महेंद्र कठाणे, श्याम चौरे, भदंत डॉ. तिस्सवंत, भदंत श्रद्धा बोधी, धनजंय वैद्य, बसंत गणवीर, राजू नोतानी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बडोले म्हणाले की, कामठी येथील ड्रॅगन पॅलेसच्या कार्यक्रमात अशोक शिलवंत यांच्याशी १४ स्तंभापैकी आपल्या जिल्ह्यातही अशोक स्तंभ व्हावा अशी चर्चा होवून ८ व्या स्तंभासाठी भिमघाट हे निश्चित झाले. ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब असून आपण त्यांचे आभारी आहोत. याठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी असून ही पावन भूमी आहे. येणाèया २३ एप्रिलाच या अशोक स्तंभाचे कार्य पूर्ण करून लोकार्पण केले जाणार असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती निमित्त बाबासाहेबांचे पदस्पर्श झालेल्या व संबंधीत ५० स्थळांचा विकास करण्याचे कार्य केले जात असून यात आंबेवड, मंडनगड यासह जिल्ह्यातील भिमघाट, कालीमाटी आदी जागांचाही समावेश आहे. हा माझा जन्म जिल्हा असल्याने अधिकाधिक या जिल्ह्याला माझे देणे आहे. ग्रामीण भागातील बुद्धविहारांची स्थिती चांगली नसून आपण फक्त शासकीय निधीवर अवलंबून न राहता स्वतःचा हातभार लावण्याची गरज आहे. समाजातील युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून उद्योग व्यापाराकडे जावून पुढे जाणे गरजेचे आहे. आजचे जग हे आऊटसोर्सिंग व कॉर्पोरेटचे आहे. यात आरक्षण नसून यासाठी आपल्या युवावर्गाला तयार व्हावे लागेल. केंद्र शासनाने अनुसूचित जातीसाठी ३५० उत्पादने राखीव ठेवली आहे. याची खरेदी कोणत्याही संस्थेने केलीच पाहिजे हे बंधनकारक आहे. यातील ४ टक्के उत्पादने हे महाराष्ट्रात राखीव आहेत. अनुसूचित जातीच्या लोकांनी या माध्यमातून उद्योग उभारणी केल्यास सर्वांचाच विकास साधला जाईल. स्टँडअप, स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून शासन अनुसूचित जाती व महिलांच्या विकासासाठी काम करत आहे. मात्र अनुसूचित जातीचे लोक यात फार मागे आहेत. अनुसूचित जाती, जनजाती व इतर मागास वर्गीय समाज हा पुढे जाण्याकरिता शासन सर्वोतोपरी कार्य करीत आहे. अनुसूचित जातीचा निधी हा नॉन डायव्हर्सेबल व नॉन लॅप्सेबल असावा यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाली असून त्यांनी याला दुजोरा दिला आहे. लंडन येथील कॅम्ब्रीज विद्यापिठात डॉ. बाबासाहेबांची मोठी कलाकृती निर्माण केली जात आहे. तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आपले विद्यार्थी जात आहेत. त्यासंदर्भातील बैठकीकरिता लंडनला जात असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुलेखाताई कुंभारे यांनी आपल्या भाषणात ना. बडोले यांचे कौतुक करून पहिल्यांदाच सामाजिक न्याय विभागाचे कार्य हे जनतेला कळत असल्याचे त्या म्हणाल्या. समाजातील युवकांनी आरक्षणाच्या मागे न लागता स्वकौशल्याने पुढे जाऊन समाजाचा विकास करून बाबासाहेबांच्या आदर्शावर चालण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी या क्षेत्राच्या विकासासाठी ना. बडोले यांनी मोठा निधी दिला असून नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, नगरसेवक घनश्याम पाणतवने यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. आगामी काळात आपण बोलण्यापेक्षा करून दाखविण्यावर विश्वास ठेवत असून सर्वोतोपरी विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांनी सुद्धा मनोगतातून केलेल्या कार्याची माहिती देवून अशोक स्मारकाबद्दल शुभेच्छा दिल्या. नगरसेवक घनश्याम पाणतवने यांच्या वाढदिवस सुद्धा शुभेच्छा देवून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन धनंजन वैद्य व लक्ष्मीकांत डहाटे यांनी तर आभार श्याम चौरे यांनी मानले. कार्यक्रमात गित ऑर्केस्टातर्फे भिमगितांचा सुरेल नजराना सादर करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाऊदास डोंगरे, प्रकाश वैद्य, संदीप डोंगरे, कमलेश वैद्य, ज्योती डोंगरे, गौतम गणवीर, प्रदीप ठवरे, श्याम गणवीर, विकास शेंडे, अजय चौरे, किशोर मेश्राम, किशोर गजभिये, गौतम शेंडे, जयंत कुंभलवार, सुशील ठवरे, अनिल डोंगरे, चंद्रशेखर सुखदेवे, चंद्रशेखर वैद्य, धिरज मेश्राम कपील नागदेवे, अंजिली जांभुळकर, सुष्मिता वैद्य, मिलिंद बागळे, अजित मेश्राम आदी उपस्थित होते.