वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

0
18

चंद्रपूर,दि.25- सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रात मोहाडी-नलेश्वर जंगलात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना आज बुधवारला(दि.25) सकाळी घडली आहे. सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्याची महिनाभरातील ही तिसरी घटना आहे.
मंदाबाई मोतीराम दांडेकर (वय ६०) असे मृतक महिलेचे नाव आहे. मंदाबाई ही सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. अचानक वाघाने हल्ला करून तिला ठार केले . वाघाच्या हल्ल्याची गेल्या २० दिवसातील याच भागातील ही तिसरी घटना आहे.