९०.२१ टक्के मतदान शिक्षक मतदारसंघ निवडणूक

0
11

गोंदिया,दि.३ : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूकीसाठी आज जिल्ह्यातील दहा मतदार केंद्रावर मतदान झाले. सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी ४ वाजतापर्यंत शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण ३३२१ मतदार असून यामध्ये २६९७ पुरुष व ६२४ स्त्री मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यात तिरोडा, दवनीवाडा, गोंदिया, आमगाव, सालेकसा, गोरेगाव, सडक/अर्जुनी, देवरी, नवेगावबांध, आणि अर्जुनी/मोर येथे मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील एकूण दहा केंद्रावर ३३२१ मतदारांपैकी २९९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदार २४६७ आणि ५२९ स्त्री मतदारांनी मतदान केले