36.1 C
Gondiā
Monday, June 29, 2026
Home विदर्भ जेसीआयतर्फे सद्भावनादिन थाटात

जेसीआयतर्फे सद्भावनादिन थाटात

0
19

गोंदिया,दि.३ :जेसीआय गोंदिया राईस सिटीतर्फे गुरूवारी सद्भावनादिन मनोहर म्युनिसिपल कॉन्व्हेंट शाळेत थाटात पार पडला. कार्यक्रमाला जेसीआय राईस सिटी संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश (रवि)सपाटे, सचिव नितीन मेश्राम, जेसीआय मधुलिका नागपुरे, जेसीआय मंजू कटरे, जेसीआय सौरभ जैन, जेसीआय नितीन लिल्हारे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन करून शाळेच्या २५० विद्यार्थी व शिक्षकांना आपली शाळा, घर व समाज समृद्ध करण्याची व इतरांना त्यासाठी प्रेरीत करण्याची, आपल्या आचार व विचारातून आपले कुटुंब व देशाचा सन्मान वाढवेल तसेच लबाडी, खोटेपणा, चोरी आदी वाईट गोष्टीपासून दूर राहणार आणि जीवनात मोठ्यांचा आदर करून प्रामाणिकपणे देशाची एकता व अखंडता कायम ठेवण्याची शपथ देण्यात आली.
यावेळी शाळेचे कु.एस.गहरवार, कु.व्दिवेदी, श्रीमती राजगुरू, नगमा पठाण, कु. यू. चक्रवर्ती, कु. एफ. अंसारी, कु. जी. मानापुरे, एस. राठोड,कु. पी. राणे, कु. पी. मोहिते आदी शिक्षक उपस्थित होते.