सवैंधानिक अधिकारासाठी लढा उभारण्याची गरज-बबलू कटरे

0
16

गोंदिया,berartimes.com दि.०६- भारतीय राज्यटनेच्या कलम ३४० अन्वये ओबीसी प्रवर्गात येणाèया जातींना सवैंधानिक अधिकार देत प्रत्येक क्षेत्रात त्या समाजाला प्रतिनिधीत्व (आरक्षण) देण्याची तरतूद डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी करुन ठेवली आहे.ते सवैंधानिक अधिकार देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्ष होत आली तरी आपल्या समाजाला मिळालेली नाहीत.ती मिळवून घेण्यासाठी पोवार समाजाने ओबीसी संघर्ष कृती समितीच्या सोबतीने लढ्यात सक्रीय सहभागी होऊन ओबीसी समाजाची एकजुटता निर्माण करण्याची गरज असल्याचे विचार ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी व्यक्त केले.ते गोरेगाव तालुक्यातील गणखैरा व गोंदिया तालुक्यातील नंगपुरा मुर्री येथे आयोजित राजाभोज जयंती कार्यक्रमात शनिवार(दि.४)प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
गणखैरा येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेरार टाईम्सचे संपादक व ओबीसी संघर्ष कृती समितीचे मार्गदर्शक तथा गोंदिया-भंडारा जिल्हा सयोंजक खेमेंद्र कटरे होते.उदघाटन क्षत्रिय राजाभोज सांस्कृतिक पर्यटन केंद्र डव्वाचे अध्यक्ष प्रा.लिलेश्वर रहागंडाले होते.यावेळी विचार मंचावर अ‍ॅड.सुनिता चौधरी,बबलू कटरे,डॉ.संदिप पटले,वामनभाऊ रहागंडाले,खुन्निलाल पारधी,भागचंद रहागंडाले,बबलू चौधरी ,विजय पटले,डोमाजी ठाकरे,नानाजी रहागंडाले,श्री शरणागत,रहागंडाले,एस.डी.रहागंडाले,योगेश चौधरी आदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आपल्या अध्यक्षीय भाषणाता खेमेंद्र कटरे यांनी पोवार समाजाला आज आपली राजकीय,सामाजिक व शैक्षणिक सत्ता टिकवून ठेवण्याची गरज निर्माण झाली असून राजकीय मतभेद सारुन समाज विकासासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.सोबतच समाजातील मुलांना डीएडबीएड पेक्षा आपला मुलगा अधिकारी कसा होईल हे शिक्षण देण्याची वेळ आल्याचे सांगत येत्या काळात पोवार समाजाने पुढाकार घेऊन गणखैरा येथे ओबीसी संघर्ष कृती समितीची शाखा गठित करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.तर उदघाटक लिलेश्वर रहागंडाले यांनी आपल्या समाजाचे कुलदैवत व आपले राजे राजाभोज यांच्या चरित्र ,इतिहास समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असणे आवश्यक असल्याने राजाभोज यांचा अभ्यास करुन त्यांच्याविचारावर समाज निर्माण करण्याची वेळ असल्याचे सांगितले.यापुर्वी गावात राजाभोज समितीच्यावतीने मिरवणुक काढण्यात आली.सायकांळी सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आले.