26.4 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ सुनील वडेट्टीवार यांचे दीर्घ आजाराने निधन

सुनील वडेट्टीवार यांचे दीर्घ आजाराने निधन

0
23

गडचिरोली, दि.१५: काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते आ.विजय वडेट्टीवार यांचे कनिष्ठ बंधू सुनील वडेट्टीवार यांचे आज दीर्घ आजाराने नागपुरातील केअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मृत्युसमयी ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.सुनील वडेट्टीवार हे गेल्या काही दिवसांपासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्यावर नागपुरातील केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्याचे शर्थीने प्रयत्न केले. परंतु प्रकृती आणखीनच बिघडल्याने त्यांना कालपासून व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. आज मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील नदीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.सुनील वडेट्टीवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनामुळे पक्षाने एक हसतमुख व मनमिळाऊ व्यक्ती आणि निष्ठावंत कार्यकर्ता गमावल्याची भावना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी व्यक्त केली.