शशिकला यांनी बंगळुरु कोर्टात केले आत्मसमर्पण

0
12

चेन्नई दि. 15 -शशिकला यांनी आत्मसमर्पणासाठी मागितलेला 2 आठवड्यांचा अवधी सुप्रीम कोर्टाने नाकारला होता. त्यानंतर बंगळुरुमध्ये त्या आत्मसपर्मण करण्यासाठी निघाल्या आहेत. दुसरीकडे, शशिकला यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मदुराईचे आमदार एस सरावानन यांनी कुवाटुर पोलिस ठाण्यात शशिकला यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.शशिकला यांनी आपले अपहरण करून गोल्डन- बे रिसॉर्टमध्ये डांबून ठेवले होते, असा आरोप आमदार सरावानन यांनी तक्रारीत केला आहे. तक्रारीत शशिकलांसोबत नवनिर्वाचित विधिमंडळाचे नेते पलानीस्वामी यांच्या नावाचा उल्लेख आहे.शशिकला यांच्या शिक्षेवर कोर्ट म्हणाले की, शशिकला यांना तत्काळ तुरुंगात जावे लागले. निर्णयात कोणताही बदल होणार नाही. तत्काळ या शब्दाचा अर्थ शशिकला यांना नव्याने सांगायला नको. शशिकला बंगळुरुला जायला निघाल्या आहेत. त्याआधी जयललिता यांच्या समाधीचे दर्शन घेतले.