आधुनिक युगामध्ये पुस्तकाबरोबर संगणकीय ज्ञान आवश्यक-आ.रहागंडाले

0
8

तिरोडा,दि.१८-ज्याप्रमाणे इमारतीचा दर्जा ही त्याच्या रंगरंगोटीवर नसून त्या इमारतीचा पाया किती मजबूत आहे यावर अवलंबून असते.त्याचप्रमाणे विद्याथ्र्यांचे प्राथमिक शिक्षणाच्या सुरवातीला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकाचे असते.तसेच आजच्या तात्रिक युगात पुस्तकीय ज्ञानाबरोबरच संगणीकय ज्ञान सुध्दा अतिआवश्यक झाल्याचे प्रतिपादन आमदार विजय रहागंडाले यांनी व्यक्त केले.ते तालुक्यातील चांदोरी बुज येथील जिल्हा परिषद उच्चप्राथमिक शाळेच्या स्नेहसमेलनाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. उदघाटक म्हणून भाजप तालुका अध्यक्ष भाऊराव कठाणे होते.पाहुणे म्हणून प.स.सदस्य मनोहर राऊत,सरपंच जयqसग उपासे,बिरोली सरपंच जयश्री बाभरे,उपसरंपच रामलाल बाभरे,अनिल नरोले,परमानंद खेवले,विठोबा ठाकरे,सेवकराम ठाकरे,भुवन नरोले,प्रकाश कावळे,सत्यफुला मस्के,शांतकला उपासे,प्रमिला ठाकरे,मिरा कावळे,रविंद्र मस्के,अनिल शहारे,प्रतिभा कुकडे,मालता कावळे,वच्छला ठाकरे,प्रमोद गौतम,सरिता भोंडेकर,ओ.जे.बिसेन आदी उपस्थति होते.संचालन डी.बी.तिमांडे यांनी केले.तर आभार मुख्याध्यापक पी.एस.मानकर यांनी मानले.