खासदाराच्या जनता दरबारात निघाले महसुल विभागाचे वाभाडे

0
18

गोरेगाव,berartimes.com दि.१८-जनतेच्या समस्या निकाली काढून त्यांचे समाधान व्हावे यासाठी गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे खासदार नानाभाऊ पटोले यांनी जनता दरबाराचे आयोजन लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुकास्थळी सुरु केले आहे.त्या अंतर्गतच गोरेगाव येथील पंचायत समितीच्या आवारात शुक्रवार(दि.१७)ला आयोजित जनता दरबारात गोरेगाव तहसिल कार्यालयाच्या गोंधळीकामकाजाचे स्वरुप जनतेच्या तक्रारीच्या माध्यमातून समोर आले.महसुल विभागाच्यावतीने खासदारांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नाचें उत्तरच समाधानकारक दिले गेलेच नाही.त्यातच वनहक्क पट्याबाबत जिल्ह्यात पालकमंत्र्यासह सर्वच जण पुढाकार घेत असताना व गेल्या काही महिन्यापुर्वीच समाधान शिबिराच्या माध्यमातून या समस्यावर तोडगा काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिल्यानंतरही खासदाराच्या जनता दरबाराच्यावेळी मात्र वनहक्काचे किती पट्टे वितरित करावयाचे आहेत,याची माहितीच महसुलच्या अधिकाèयाकडे नसल्याचे जनतेने बघितले.प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असो की पुनवर्सनाचे कुठलेही समाधान महसुल विभाग करु शकले नाही,तरीही खासदार महोदयांनी अधिकाèयांची बाजू घेत जनतेला वेळ द्या लवकरच प्रश्न मार्गी लागतील असे आश्वासन देऊन जनतेचे समाधान करण्याचे प्रयत्न केले.
या जनता दरबाराला खासदार नाना पटोले,आमदार विजय रहागंडाले,सभापती दिलीप चौधरी,उपसभापती सुरेश बिसेन,तहसिलदार कल्याणकुमार डहाट,गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे,पोलीस निरिशक सुरेश कदम,जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे,रेखलाल टेंभरे,रविकांत बोपचे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
कंटगी व कलपाथरी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर गोंदिया मध्यम प्रकल्प विभागाचे शाखा अभियंता पटले व भैरम हे व्यवस्थित माहितीच देऊ शकले नाही.प्रकल्पग्रस्त नागरिक न्यायालयाने दिलेल्या निर्णायनंतरही मोबदला व इतर सुविधा मिळत नसल्याची तक्रार करीत असतानाच भैरम व पटलेंना मात्र न्यायालयाच्या निर्णयाची माहितीच नसल्याचे दिसून आले.वनहक्क पट्याबाबत हौसलाल रहागंडाले यांच्यासह अनेकांनी प्रश्न उपस्थित केले.तर गेल्यावर्षी आलेल्या एप्रिल महिन्यातील अवकाळी पावसाची नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याचे साहेबलाल कटरे यांच्यासह अनेकांनी प्रश्न माडंले मात्र यावर कुठलेही उत्तर महसुलविभागाचे प्रमुख तहसिलदार देऊ शकले नाही.जनता दरबारात जनतेने समस्या अनेक मांडल्या मात्र्य समस्यांचे समाधानच झाले नसल्याने जनता दरबाराचा उपयोग तरी काय अशा प्रश्न उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.त्याचप्रमाणे तलाठ्याने जनतेला त्रास न देता सहकार्य करावे अन्यथा आम्हालाही काय कायदे आहेत याची जाणीव करुन द्यावी लागेल अशा शब्दात कुèहाडीच्या तलाठ्याला खासदारांनी खडसावले.वनविभाग,जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचे अधिकाèयांनी जनता दरबारालाच दांडी मारली होती.