अमरावतीत भरारी पथकाकडून 14 लाख जप्त

0
8

अमरावती:दि. 19 – निवडणूक भरारी पथकानं अमरावतीमध्ये 14 लाख रुपयांची रोख रक्कम पकडली आहे. अमरावती कारंजा रोडवरील बडनेरा वाय पॉईंटवर ही कारवाई करण्यात आली.व्यापारी रमेश मुंदडा यांची ही रक्कम असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अमरावती पोलीस सध्या त्यांची चौकशी करत आहेत. व्यापारासाठी आपण ही रक्कम आणल्याचं त्यांचं म्हणणं आहे.काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास व्यापारी रमेश मुंदडा कारंजावरुन ही रक्कम गाडीने अमरावतीला आणत होते. त्यावेळी निवडणूक भरारी पथकानं त्यांच्या गाडीतील रोकड ताब्यात घेऊन त्यांची चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यावेळी आपण ही रक्कम व्यापारासाठी आणल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.जप्त केलेल्या रकमेत 10 रुपयांच्या लहान नोटांपासून 100 रुपयांच्या नोटांसह 2000 रुपयांच्या नोटांचाही समावेश आहे.