विभागीय आयुक्तांनी घेतला जि.प.च्या विकासकामाचा आढावा

0
9

गोंदिया,दि.२२-नागपूर विभागीय आयुक्त अनुपकूमार यांनी आज(दि.२२) गोंदिया येथे येऊन जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांचा आढावा घेतला.आयुक्त अनुपकूमार यांचे सकाळी गोंदियात आगमन झाले.त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती घेतली.जलयुक्त शिवार व मग्रारोहयो योजनेच्या कामात कुठलीही हयगय चालणार नसल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.त्या आधी आयुक्तांची जि.प.सीईओ डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिमन्यू काळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे,राजकुमार पुराम,श्री अंबादे,कृषी विभागाच्या वंदना qशदे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.निमगडे,लपा विभागाचे कार्यकारी अभियंता पाथाडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.