39.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ खासदार पटेलांच्यावतीने प्रतापगडावर महाप्रसादाचे वितरण

खासदार पटेलांच्यावतीने प्रतापगडावर महाप्रसादाचे वितरण

0
24

अर्जुनी मोरगाव,दि.२४-दरवर्षीप्रमाणे यावेळी सुध्दा महाशिवरात्रीच्यापावनपर्वावर तालुक्यातील पवित्रस्थळ प्रतापगड येथील महाशिवरात्री यात्रेच्यावेळी माजी मंत्री व राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल आणि मनोहरभाई पटेल अकादमीच्यावतीने भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी प्रतागडावरील महादेवाचे दर्शन घेऊन पुजाअर्चना केली.त्यानंतर पायथ्याशी आयोजित महाप्रसादवितरण मंडपात उपस्थित भाविकांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.यावेळी अवनी देशपांडे, पूर्णा पटेल, देवेन्द्रनाथ चौबे, निखिल जैन, राजकुमार एन जैन, मनोहर चंद्रिकापुरे, नामदेव डोंगरवार, किशोर तरोने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आदी मान्यवर उपस्थित होते.