24.1 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ ‘जेसीआय’चा शपथ विधी सोहळा

‘जेसीआय’चा शपथ विधी सोहळा

0
31

गोंदिया दि.०१ मार्च=: जेसीआय गोंदिया राईस सिटीच्या पदाधिकारी व सदस्यांचा शपथ विधी सोहळा नुकताच येथील पॅसिफीक हॉटेलमध्ये उत्साहात पारपडला. प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक इंगळे उपस्थित होते. यावेळी जेसीआयचे अंचल अध्यक्ष स्वातिकजैन, माजी राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम मोदी, अंचल अधिकारी धर्मिष्ठा सेंगर, माजी अध्यक्ष अंकुश डोडानी, विद्यमान अध्यक्ष रवि सपाटे प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्ष रवि सपाटे यांनी, सन २0१७ च्या पदाधिकारी नितीन मेर्शाम, मधुलिका नागपुरे, नितेश कठाणे, डॉ. रश्मि रहांगडाले, उमंग शाहू, युगल अग्रवाल, स्वाती चव्हाण, शुभम अग्रवाल, निलेश फुलबांधे, सागर सोनवाने, अंकित धनविजय, शैलेंद्र कावळे, श्रीकांत वैराळे, अंकीत गोस्वामी, रेखा केलनका, प्रतिक्षा केलनका यांना शपथ दिली. अंचल ९ चे अध्यक्ष स्वातिक जैन यांनी सदस्य राम लालवानी, मानसी कात्रे, कशिश कौशीक, शाहीन कुरेशी, अनुराग इंगळे, वैशाली भिमटे, पिंकी कुदरानी, सेजल पटेल, अंजली कौशिक, दिशा क्रिश्नानी, डॉ. छाया पटेल आदींना शपथ दिली.