24.4 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ परीक्षा केंद्रावर कलम १४४ लागू

परीक्षा केंद्रावर कलम १४४ लागू

0
29

१२ मार्चला राज्य लोकसेवा आयोग परीक्षा
गोंदिया,दि.३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षा-२०१६ ही परीक्षा येत्या १२ मार्च २०१७ रोजी गोंदिया येथील बी.एन.आदर्श सिंधी विद्या मंदीर हायस्कूल मुर्री रोड, गुजराथी नॅशनल हायस्कूल रेलटोली, मनोहर मुन्सीपल हायर सेकंडरी स्कूल अंसारी वार्ड इंदिरा गांधी स्टेडियम जवळ, राजस्थान कन्या विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् कृष्णपुरा वार्ड, एस.एस.गर्ल्स कॉलेज विठ्ठल नगर या पाच केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने १२ मार्च रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे अस्त्र, शस्त्र व कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे उदा. कॅलक्युलेटर, मोबाईल, लॅपटॉप, पेजर, फॅक्स मशिन, झेरॉक्स मशिन इत्यादीचा वापर किंवा जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. हा आदेश १२ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी प्रविण महिरे यांनी कळविले आहे.