25.2 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ मनपाकडे पावणेचार कोटी रुपये थकीत

मनपाकडे पावणेचार कोटी रुपये थकीत

0
32

चंद्रपूर दि. 4 –:चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. इरई धरणातून पाणी घेताना महानगरपालिका प्रशासनाला बिगर सिंचन पाणी पट्टी देयक पाटबंधारे विभागाकडे अदा करावे लागते. मात्र मागील अनेक वर्षांपासून मनपा प्रशासनाने पाटबंधारे विभागाला पाणी पट्टी देयके अदाच केली नाही. याचे तब्बल तीन कोटी ७८ लाख ६८ हजार ५६४ रुपये मनपाकडे थकित आहेत. येत्या १० मार्चपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने हा भरणा करावा अन्यथा ११ मार्चपासून इरई धरणातून मनपाला होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात येईल, असा अल्टिमेटमच पाटबंधारे विभाागाने मनपाला दिला आहे.